करमाळाधार्मिक

केतूरात दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

 केतूर (राजाराम माने ); केतूर (ता.करमाळा ) येथील दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदी व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.सायंकाळी साडेसहा वाजता दत्त जन्मोत्सव झाल्यानंतर फुलांची व फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.

यावेळी रमेश महाराज शिवापुरकर (सोलापूर) यांचे कीर्तन झाले.यावेळी परिसरातील भाविक भक्तांनी मंदिर परिसर फुलून गेला होता.यामध्ये महिलाची उपस्थिती लक्षणीय होती.अरे या भाविकांना यावेळी महाप्रसाद दत्तसेवा मंडळातर्फे देण्यात आला.

आठवडाभर चाललेल्या धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला होता.

litsbros

Comment here