करमाळाक्राइमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

करमाळा पोलिसांचा अवैध धंद्या विरोधात धडाका ; पण खेडोपाड्यातील हातभट्टी कधी थांबणार ?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई; दोन दिवसात 30 लाखाहून अधिक किमतीचा अवैध मुद्देमाल जप्त

करमाळा माढा न्यूज; निवडणुकीच्या काळात देशी – विदेशी दारू मतदार व युवकांना काही महाभाग पुढारी फुकट वाटतात व युवा पिढी दारूच्या व व्यसनांच्या आहारी जाते. आचारसंहितेचा ताण असताना करमाळा पोलिसांनी अवैध धंदे, जुगार, दारू विक्री याकडे जास्त लक्ष दिल्याने फुकट मतांसाठी फुकट वाटणारांचे व फुकट पिणारांचे ही धाबे दणाणले आहेत.

23 सप्टेंबर ला एका ट्रक मधून चालवलेला 25 लाखाहून अधिक किमतीचा गुटखा रात्री गस्त घालणारे करमाळा पोलीस चेतन गवंडी व संतोष वाघमारे यांनी पाठलाग करून पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पकडला. याप्रकरणी राजस्थानातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तर दुसऱ्या दिवशी तालुक्यातीलच पोमलवाडी केत्तुर रस्त्यावर अवैध दारू विक्री होते अशी खबर पोलिसांना लागल्याने पोलिसांनी नियोजनबद्ध रित्या या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा तेथून पोलिसांना 73 बाटल्या विदेशी दारू व दारू वाहून नेणारी झायलो कार सापडली , तसेच तेथील विक्री करणाऱ्या राजेंद्र रामचंद्र खटके(वय 32, रा.केतूर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. येथे दारु व गाडी सह 5 लाख 9 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसानी जप्त केला आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी जुगार अड्ड्यावर ही छापा मारला होता.

करमाळा पोलिसांबद्दल जनतेतून समाधान व्यक्त पण…

ऐन आचारसंहिता असण्याच्या काळात पोलिसांनी तळीरामांना दारू व अवैध गोष्टी पासून लांब ठेवण्याचा जणू धडकाच लावला आहे. ही धडक कारवाई करणारे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील व सर्व पोलीस यांचे कामगिरी बद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

…पण आता एवढ्यावरच न थांबता तालुक्यातील खेडोपाडी व गावागावात सुरू असणारी हातभट्टी व विदेशी किरकोळ दारूविक्री तसेच अनेक महत्त्वाच्या गावांच्या रोडच्या कडेने असलेल्या छोट्या मोठ्या हॉटेलात ही मोठया प्रमाणावर दारूविक्री राजरोसपणे सुरू आहे. इकडेही लक्ष देऊन हे अवैध धंदे लवकरात लवकर थांबवावेे अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.

सध्या आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे गाड्या तपासणी, अवैध धंद्यावर कारवाई सुरूच आहे. आमचे तालुक्यात कायदा व सुरक्षा व्यवस्था राखण्यावर विशेष लक्ष आहे. खेडोपाड्यातील अवैध धंदे ही लवकरच पुर्णतः बंद करू.

– सर्जेराव पाटील, (पोलीस निरीक्षक-करमाळा)

litsbros

Comment here