आरोग्यकरमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात कोरोनाच्या भीतीने नागरिक बेचैन; जनजीवनही झाले विस्कळीत

केतूर(राजाराम माने);  कोरोना विषाणू संदर्भात तातडीच्या उपाययोजना म्हणून जगातील स्पेन तसेच अमेरिकेमध्ये तत्काळ आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.जगातील १५१ देश कोरोनाग्रस्त आहेत.त्यातच देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने आपल्या देशांनेही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील ग्रामीण भाग वगळता सर्व शाळा-महाविद्यालय ३१ मार्च पर्यंत बंद राहणार आहेत.तर देशातही कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे.


एकूणच कोरोना विषाणूजन्य व्हायरसच्या भीतीने ग्रामीण भागातील नागरिकांची अक्षरशः पाचावर धारण बसली आहे.एरवी कामधंद्यासाठी पुणे,मुंबईला जाणारी लोक पुणे मुंबई कडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रिकाम्या धावत आहेत तर पुणे मुंबईहून गावाकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या मात्र गर्दीने फुल भरून गावाकडे येत आहेत.

ग्रामीण भागात आरोग्य खाते व प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र कोरोना संसर्गजन्य विषाणू विषयी अजूनही कोठेही जनजागृती होताना दिसत नाहीत प्राथमिक आरोग्य केंद्र अगोदरच सलाईनवर असल्याने हा प्रकार पाहावयास मिळत आहे.


त्यातच जवळच असणाऱ्या पुणे परिसरात दिवसागणिक कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.कहर म्हणजे देशात कोरोना विषाणूजन्य व्हायरस हा मुंगी एवढाच आहे,आपली भारतीय मीडिया मात्र त्याला हत्ती पेक्षा मोठा भासवत असल्याने भीतीत भर पडत आहे.

Advertising 4

त्यातच भर म्हणजे सोशल मीडियावर पूर्ण संबंधित भितीदायक मेसेज व्हायरल होत आहेत.नागरिक मात्र स्वतः काळजी घेताना दिसत आहेत तोंडाला रुमाल तसेच मास्क बांधणे,हात स्वच्छ ठेवणे असे प्रकार वाढले आहेत.


कोरोनाचा संसर्ग होऊ नये यामुळे बहुतांश प्राथमिक शाळांनी आपली स्नेहसंमेलन रद्द केले आहेत तर गावच्या ग्रामदैवतांच्या जत्रा,यात्रा या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून या जत्रा,यात्राही रद्द करण्यात आल्या आहेत.एकूणच कोरोना विषाणूजन्य व्हायरसच्या भीतीने जनजीवन मात्र विचलित झाले आहे हेच खरे.

litsbros

Comment here