आम्ही साहित्यिककरमाळासांस्कृतिक

करमाळयात सर्वोदय प्रतिष्ठान आयोजित बौद्धिक व्याख्यानमाला : करमाळाकरांना वैचारीक मेजवानी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा : नेहमी समाजोपयोगी कार्य करणाऱ्या सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे हे 9 वे वर्ष आहे. दरवर्षी या व्याख्यानमाले अंतर्गत श्रोत्यांना अनेक जेष्ठ वक्ते व विचारवंताचे विचार ऐकण्याची संधी मिळत आहे.

यावर्षी शुक्रवारी दि. ११ जानेवारी २०१९ रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. राजेंद्र दास यांचे ‘चला असं जगुया’ या विषयावर व्याख्यान होईल. शनिवार दि १२ जानेवारी २०१९ रोजी यशकल्यानी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांचे ‘शिक्षण – काल , आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान होईल. तर रविवारी 13 जानेवारी रोजी सुप्रसिद्ध कवी नारायण सुमंत यांचे ‘वारी ते बारी’ या विषयावर व्याख्यान होईल. हे सर्व कार्यक्रम दत्त मंदिर, विकास नगर, कॉटेज हॉस्पिटल समोर येथे सायंकाळी 6 वाजता होतील. या कार्यक्रमानां नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

litsbros