करमाळाताज्या घडामोडीपंढरपूरमाढाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाची निविदा मंजूर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर (९ सप्टेंबर) – उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी कामाची निविदा मंजूर करण्यात आली आहे. या जलवाहिनीच्या कामासाठी ३३ महिन्याची मुदत देण्यात आली असल्याची माहिती महापौर शोभा बनशेट्टी आणि आयुक्त डॉ. दीपक तावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या समांतर जलवाहिनीची योजना ही ४५० कोटी रुपयांची असून याकरिता एनटिपीसी २५० कोटी तर स्मार्ट सिटी योजनेतून २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी यांनी आपल्या कारकिर्दीत हे काम होत असल्याने मानसिक समाधान मिळाल्याची भावना व्यक्त केले.

litsbros

Comment here