करमाळा

आमदार संजय मामा शिंदे पोहचले थेट जिंतीत, जाणून घेतल्या ग्रामस्थांच्या भावना; प्रशासनाला केल्या सूचना

आमदार संजय मामा शिंदे पोहचले थेट जिंतीत, जाणून घेतल्या ग्रामस्थांच्या भावना; प्रशासनाला केल्या सूचना

केतूर ( राजाराम माने) : सोलापुरातील काही अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांच्या संपर्कात आल्यामुळे करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे हे काही दिवस होम क्वारंटाईन होते. पण होम क्वारंटाईन संपताच आमदार संजय मामा आज करमाळा तालुक्यात सक्रिय दिसून आले. आज करमाळा शहरातील बैठक संपवून ग्रामीण भागात जिंती येथे कोरोनाचे चार रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर जिंती गावाला कॅन्टोन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

करमाळा माढा न्यूज च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी आमचा 9067564080 क्रमांक तुमच्या ग्रुपला ऍड करा.

कोविड 108 अम्ब्युलन्स तालुक्यासाठी मिळावी व करमाळा कोविड सेंटरमध्ये काॅर्नटाईन रूग्णाला अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात हि मागणी जि प सदस्या सवितादेवी राजेभोसले यांनी केली.लवकरच आपल्याला सर्व सुविधा मान्य करून पुढील कार्यवाही होईल असे आमदार शिंदे व तहसिलदार यांनी सुचित केले.

यावेळी तहसिलदार समीर माने,पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडूळे, जि.प.सदस्या सवितादेवी राजेभोसले,गटविकास अधिकारी श्रीकांत खरात ,उद्धव माळी ,तानाजी झोळ, पं.स.सदस्य दत्ता जाधव, डाॅ घोगरे ,डाॅ राहूल कोळेकर, डॉ बाबासाहेब गाढवे, डाॅ गोरख गुळवे,डाॅ पोटे जिंतीचे सरपंच संग्राम राजेभोसले, आशपाक जमादार,गणेश घोरपडे,सर्कल काझी,तलाठी शेटे व गोडसे, ग्रामसेवक नवनाथ पांडव व गवळी उपस्थित होते.

तसेच नागरिकांनी सतर्क व दक्ष राहून प्रशासनास सहकार्य करावे , प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आमदार संजय मामा शिंदे यांनी केले आहे. 

हेही वाचा- सोलापूर जिल्हा ग्रामीण मध्ये आज शुक्रवारी ३७ नवे बाधित तर दोघांचा मृत्यू; वाचा आज कोणत्या तालुक्यात किती?

करमाळा तालुक्यातील प्रलंबित 19 कोरोना अहवालांपैकी 10 प्राप्त; वाचा नेमकं काय झालं.?

 

litsbros

Comment here